युवा पत्रकार तुषार महाजन यांना ग्रीन वर्ल्ड पुरस्कार जाहीर..!
अहमदनगर (प्रतिनिधी) :
शिर्डी येथील तुषार संजय महाजन यांना ग्रीन वर्ल्ड पुरस्कार जाहीर करण्यात आला. आदर्श पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, तुषार महाजन यांना आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त ग्रीन वर्ल्ड पुरस्कार जाहीर करण्यात आला. आदर्श पत्रकार म्हणून ओळख असलेला सामाजिक आणि पर्यावरण विषयक प्रत्येक कार्यात हिरिरीने आपला सहभाग नोंदवितात.
आदरणीय तुषार महाजन साहेब, आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात आपण कार्यरत आहे. आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून सर्व सामान्य वाचकापासून तर सुशिक्षित वाचकांना वृत्तपत्र उपलब्ध करून रात्रदिवस आहोरात्र जनजागृती करत आहे. बलशाली भारत घडविण्यासाठी आपण आणखीन जोमाने काम करावे यासाठी आपला ग्रीन वर्ल्ड पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने तुषार महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये काम केले, यासोबतच समाजातील घडणाऱ्या घटना प्रतिबिंबित करणारे माध्यम म्हणजे पत्रकारिता क्षेत्र यात देखील ते वेळेचा सदुपयोग करत कार्यरत आहेत. सध्या शिर्डी शहरातील युवा वॉरियस अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि समाजाने आपल्या साठी काय केले यापेक्षा आपण समाज व देशासाठी काय करू शकतो हे महत्वाचे असून सर्वांनी संकटात खचून न जाता ; भेदभाव न करता एकमेकांस सुख दुःखात मदत करण्याची भावना असायला हवी असे नेहमी आम्हा सर्वांना ते मार्गदर्शन करीत असतात, साईबाबांच्या आशिर्वाद नेहमीच मला प्रेरणा देतात व सेवेत आनंद मिळतो, अनेकांनी मला जीवनात आज येथेपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यांचा मी शतशः आभारी आहे अशी भावना ते आवर्जून व्यक्त करतात, अशा या सामाजिक बांधिलकी असलेल्या या ध्येयवेड्या आणि कार्यमग्न तुषार महाजन या व्यक्तीमत्वास असेच समाजहीताचे कार्य करण्यास बळ मिळत राहवे.
आपल्या अनोख्या उपक्रमाच्या शैलीने कायम चर्चेत राहणाऱ्या तुषार महाजन यांच्या विशेष प्रयत्नाने विविध उपक्रम, मोहीम, प्रकल्प, अभियान यशस्वीरीत्या पार पडली आहेत हे विशेष ग्रीन फाउंडेशनचा मानाचा आणि प्रतिष्ठित समजला जाणारा ग्रीन वर्ल्ड पुरस्कार युवा पत्रकार तुषार महाजन यांना पुरस्कार जाहीर झाला.
