पेन्सिलच्या सहाय्याने हुबेहूब स्केच रेखाटणारी" मयुरी"
गेवराई (प्रतिनिधी)जीवनामध्ये प्रत्येक जण आपल्या आवडीचा छंद लहान पणा पासुन जोपासत असतो त्यामध्ये चित्रकला ही एक वेगळीच कला आहे तसेच गेवराई शहरातील राम मंदिर गल्ली, गेवराई येथील कु. दायमा मयुरी स्वप्निल हिने पेन्सिलने काढलेले चित्र नागपंचमी निमित्त झोका खेळताना तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त मेरा भारत महान अशा प्रकारे अनेक हुबेहूब चित्रे रेखाटली आहेत
चित्रकला खूप छान कला आहे. चित्रकला या कलेच्या माध्यमातून मयुरी दायमा हिला लहानपणापासूनच चित्र काढण्याची आवड निर्माण झालेली आहे रेखाटण्याची कला अवगत असल्यामुळे तीच्या या कलेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तिने काढलेले चित्र पाहून अनेकांची तीला कौतुकाची थाप मिळत आहे. असे अनेक प्रकारचे पेन्सिलच्या सहाय्याने हुबेहूब स्केच काढल्याने तिला त्यामध्ये सतत नेहमी चित्रकलेमध्ये अधिकच आवड झाली असुन तिने हुबेहूब चित्र रेखाटल्यांने तीच्या कलेला पाहून अनेक जण अचंबित होत आहे तिच्या या उल्लेखनीय कार्यामुळे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे
