श्री मंगलनाथ अर्बन मल्टीपल निधी लि.च्या सिरसदेवी शाखेचा दि. 15 ऑगस्ट रोजी प्रथम वर्धापन दिन
संत महंत मान्यवर मंडळी यांची प्रमुख उपस्थिती
गेवराई (प्रतिनिधी) येथिल श्री. मंगलनाथ अर्बन मल्टीपल निधी लि. च्या सिरसदेवी शाखेचा दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्रथम वर्धापन दिन सकाळी 11 वाजता संत- महंत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कोरोना संदर्भातील शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून दुसऱ्या वर्षात पदार्पण होणार आहे या कार्यक्रमास सिरसदेवी व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित रहावे असे अवाहन चेअरमन केशव अण्णा पंडित यांनी केले आहे
तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात ज्यांनी आपल्या आयुष्याचे अनमोल भारत मातेसाठी तथा देश सेवेसाठी अर्पण केले अशा वीर जवान तसेच आजी माजी सैनिकांचा सन्मान श्री. क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज, खेर्डा येथील श्री पांडुरंग आश्रमाचे महंत ह. भ. प. श्री. भागीरथ महाराज दुर्वे यांच्यासह संत महंत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येईल तसेच श्री मंगलनाथ अर्बन मल्टीपल निधी लि.या बँकेची प्रथम स्थापना संस्थापक अध्यक्ष केशवराव पंडित यांनी आपल्या मित्र परिवाराला बरोबर घेऊन गेवराई येथे शाखा सुरू केली त्यानंतर तालुक्यातील सिरसदेवी येथे एक वर्षापूर्वी शाखा सुरू केलेली आहे नंतर गढी येथे ही याच परिवाराची बळीराजा मल्टीपल निधी या नावाने बँकेची शाखा कार्यरत आहे तसेच या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे अवाहन चेअरमन केशव पंडित यांच्यासह कर्मचारी वर्ग यांनी केले आहे
