राज्यस्तरीय ट्रेडिशनल हायलाईट व्हिडिओ स्पर्धेत फोटोग्राफर बाळराज खोजे यांच्या व्हिडीओला राज्यात दुसरा क्रमांक
----------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त रिस्पेक्ट
वेडिंग फोटोग्राफर & व्हिडिओग्राफर अभियान भारत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ट्रेडिशनल व्हिडिओ हायलाईट या स्पर्धेत गेवराई येथील कॅमआर्ट स्टुडिओचे फोटोग्राफर बाळराज खोजे यांच्या व्हिडिओला राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला असून याबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
दि.19 रोजी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त रिस्पेक्ट वेडिंग फोटोग्राफर & व्हिडिओग्राफर अभियान भारत या संस्थेच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या फोटोग्राफर यांनी आपले वेडिंग हायलाईट व्हिडीओ ऑनलाईन अपलोड केले होते. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात फोटोग्राफर यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये गेवराई येथील कॅमआर्ट स्टुडिओचे फोटोग्राफर बाळराज खोजे यांनी सहभाग नोंदवत आपला ऑनलाईन व्हिडीओ अपलोड केला आसता त्यांना राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला असून या संस्थेच्या वतीने त्यांचा रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याबद्दल त्याचे सर्व फोटोग्राफर,नातेवाईक,मित्रपरिवार यांच्यासह सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.