रमाधाम वृद्धाश्रमातील वृद्धांना कोरोनापासून सुरक्षित
राहण्यासाठी वस्तु भेट
मुंबई ।।प्रतिनिधी महेश्वर तेटांबे दै महाभारत
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांनी काल दिनांक २० ऑगस्ट, २०२० रोजी खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमास या आश्रमाचे ट्रस्टी या नात्याने भेट देऊन तेथील व्यवस्थापनेची इतर मान्यवरांसमवेत पाहणी केली. तेथील वृद्धांबरोबर वायकरांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे ते या आश्रमास वारंवार भेट देत असतात.
वृद्धाश्रमात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांची विचारपूस करून त्यांना बेडशीट, चटई इत्यादी वस्तू देऊन कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या, तोंडाला लावण्यासाठी मास्क, सॅनिटायझर इत्यादी वस्तूंच्या किट दिल्या.*
याप्रसंगी रमाधाम वृद्धाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री मामा वैद्य, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री आदेश बांदेकर, वामन भोसले, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, उपविभाग प्रमुख के एल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.