बौद्धांनी एकजुटीने राहावे ही भदंत सदानंद महाथेरो यांची ईच्छा होती - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई - समाजात ऐक्याच्या भावनेचा अभाव नसावा; ऐक्याची भावना प्रबळ असावी. आपला सगळा बौद्ध समाज एकजूट राहावा.सर्वांनी ऐक्य भावनेने राहावे ही पूज्य भदंत सदानंद महाथेरो यांची ईच्छा होती असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. चेंबूर टिळकनगर येथील सर्वोदय बुद्ध विहार येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष संघानुशासक दिवंगत पूज्य भदंत सदानंद महाथेरो यांच्या पुण्यानुमोदन जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.त्यावेळी ना रामदास आठवले यांनी दिवंगत निर्वाणस्थ पूज्य भदंत सदानंद महाथेरो यांना आदरांजली अर्पण केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पूज्य भदंत संघनायक करुणानंद महाथेरो;पूज्यभदंत प्रज्ञादीप महाथेरो;पूज्य भदंत विपश्यनाचार्य डॉ राहुल बोधी महाथेरो;भदंत बोधिपालो महाथेरो; आदी भिक्खू संघ उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे ऐतिहासिक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या सोहळ्यात तरुण वयाचे भदंत सदानंद महाथेरो उपस्थित होते. नागपुरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केल्याचा प्रभाव म्हणून विदर्भातील तरुण राजकारणापेक्षा धम्म प्रसार चळवळीकडे वळले. विदर्भातील आंबेडकरी तरुणांचा ओढा हा राजकरणापेक्षा धम्म चळवळीकडे अधिक राहिला त्यामुळे मोठया प्रमाणात विदर्भातील तरुणांनी चिवर परिधान करून भिक्खू संघात बौद्ध धम्म प्रसार चळवळीला स्वतःला वाहून घेतले. त्याची अनेक उदाहरणे असून दिवंगत पूज्य भदंत सदानंद महाथेरो हे होते. त्यांचा जन्म भंडारा जिल्ह्यात झाला होता. त्यांनी वर्धा जिल्ह्यात केळझर येथे सुंदर मॉनेस्ट्री उभारली आहे. तेथे एका सभागृहाच्या उडघटनाला त्यांनी मला बोलविले होते.आम्ही अनेकदा भेटलो. त्यात त्यांनी आपला सगळा बौद्ध समाज एकत्र राहावा अशी भूमिका ते नेहमी मांडत असत असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी पूज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो हे सुद्धा विदर्भातील भंडारा जिल्ह्यात जन्माला आले असून त्यांनी ही बौद्ध धम्म प्रसार चळवळीला वाहून घेतले आहे.त्यामुळे विदर्भातील आंबेडकरी तरुण हे नेहमी राजकारणापेक्षा बौद्ध धम्म चळवळीला वाहून घेणारे असून ते निश्चितच अभिमानास्पद असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
आपला
सनी गायकवाड
रिपब्लिकन दिव्यांगजन विकास आघाडी ठाणे प्रदेश
अध्यक्ष