गेवराई / प्रतिनिधी
वंचीत बहुजन आघाडीच्या डफली बजओ अंदोलनापुढे आखेर राज्य सरकार अंतरजिल्हा बस सेवा सुरु करण्यास भाग पाडले. महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्ष ईतर असला तरी खऱ्या विरोधी पक्षाची भुमिका वंचीत बहुजन आघाडी मांडत असुन जनतेचे प्रश्न शासन दरबारी निवेदन,अंदोन,मोर्चे काढुन मांडून मार्गी लावत आहे अजयकुमार पप्पु गायकवाड यांनी प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.
देशभरात कोरोना महामारीमुळे सर्वञ लॉकडाऊन असल्याने काही सोडल्या तर सर्वच शासकिय सेवा बंद आहेत. यात बेस्ट व महापरिवहनची एसटी बस सेवा बंद असल्याने बस कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काहींनी हातातली स्टेरिंग सोडुन हमाली सुरु केली तर काहींनी टीकेट मशीन सोडुन हातात विट व सिमेंट काँक्रिटचे टोपले हातात घेत गवंडी काम सुरु केले होते. या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपल्याची व शेतकऱ्यांना आपला शेतीमाल ईतर जिल्ह्यात घेवुन जाण्यासाठी वाहन नसल्याने शेतकऱ्यांना आर्थीक नुकसान सहन करावी लागत होती व सर्वसामान्य लोकांना महाराष्ट्रातील प्रमुख दळन-वळनाची बस सेवा बंद असल्याने अनेक आडचनिंणा सामोरे जावे लागत होते.
बस कर्मचारी, शेतकरी व सर्वसामान्य लोकांना केंद्र व राज्य सरकार कोरोनाची भिती दाखवुन लॉकडाऊन करुन वेठीस धरत असल्याने या अन्यायाविरोधात अॅड.प्रकाश आबेंडकर यांच्या आदेशावरुन वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्यात प्रत्येक बस स्थानक व आगारात १२ ऑगस्ट रोजी डफली बजाओ अंदोलन करुन राज्य सरकारला अखेर राज्यात जिल्हा आंतर्गत बस सेवा सुरु करण्यास भाग पाडले.
अशी माहीती भारीप बहुजन महासंघाचे मा.गेवराई तालुका अध्यक्ष अजयकुमार पप्पु गायकवाड यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे दिली.