महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर चातुर तर सेक्रेटरी पदी गणेश बापू चव्हाण यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर चातुर तर सेक्रेटरी पदी  गणेश बापू चव्हाण यांची बिनविरोध निवड



 गेवराई प्रतिनिधी

महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची बीड  विभागाची सर्वसाधारण सभा संपन्न 2025-2026दिनांक 17-08-2025 वार रविवार रोजी एकमेव मान्यता प्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या बीड विभागाची सर्वसाधारण सभा हॉटेशांताई,जालना रोड,बीड येथे घेण्यात आला.
या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद बीड आगाराचे ज्येष्ठ वाहक 
 सुनील भाऊ टाक यांनी भूषविले .....
कार्यक्रमाची सुरवात ही कामगारांचे दैवत असलेले, स्व.श्री भाऊ फाटक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून करण्यात आले.यानंतर  गेवराई आगारातील लिपिक कर्मचारी कै.प्रितेश चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व सभेतर्फे अर्पण करण्यात आली. तसेच  गणेश बापू वर विश्वास ठेवून बीड विभागीय कार्यालयातील लिपिक प्रताप शिंदे तसेच त्यांच्या इतर सर्व सदस्यांनी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेत प्रवेश केला कार्यक्रमासाठी बीड विभागातील बीड आगार अध्यक्ष: राजु पवार व सचिव:- नितिन रसाळ 
बीड विभागीय कार्यलय अध्यक्ष:- संतोष मुळे व सचिव:- विकास गाडेकरमाजलगाव  आगार अध्यक्ष: लिबाजी पोटभरे व सचिव:- सुरेद्र पवार गेवराई आगार अध्यक्ष:- ज्ञानेश्वर चातूर व सचिव:- सुयोग दाभाडे बीड विभा. कार्यशाळा अध्यक्ष:-जी जे पांचाळ व सचिव:- देवराज यमपुरे आष्टी आगार अध्यक्ष:- गणेश काळे व सचिव:-सचिन काळे
 धारुर आगार अध्यक्ष:- डी बी मुंडे व सचिव:-जगदीश थोरात पाटोदा आगार अध्यक्ष:-गणेश रसाळ व जेष्ठ कार्यकर्तें:- अजिनाथ वारे तसेच बीड विभागातील कामगार संघटनेचे सर्व डिलिगेट्स व असंख्य सभासद हजर होते सर्वानुमते बीड विभागीय अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर चातुर यांची तर बीड विभागीय सचिव पदी गणेश बापू चव्हान यांची निवड करण्यात आली तसेच बीड विभागीय कार्याध्यक्ष पदी  रमेश भाऊ गीते,संघटक सचिव पदी श्रीवल्लभ चिरके,सहसचिव पदी  विजय कुडके,तर कोषाध्यक्षपदी पुन्हा विलास आजले  यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्र संचालन हे श्री.प्रताप शिंदे यांनी केले तर समस्त पदाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ टाक यांनी संबोधित केले तसेच नवनियुक्त अध्यक्ष व सचिवांनी पण कामगार संघटना कामगारांसाठी कशी काम करते व येणाऱ्या काळात संघटनेचे कार्य कसे असेल याबद्दल माहिती दिली सदर कार्यक्रम हा अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात संपन्न झाला.