डॉ अनिकेत निंबोरे यांचे यश
आष्टी: डॉ. अनिकेत सोपान निंबोरे यांनी नुकतेच नवी दिल्ली येथील नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन द्वारे घेतलेल्या फॉरेन मेडिकल ग्रॅड्यूएट एक्झामीनेशन या परीक्षेत यश संपादन केले आहे.
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान रावसाहेब निंबोरे यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत निंबोरे यांनी नुकत्याच झालेल्या एफएमजीई म्हणजेच फॉरेन मेडिकल ग्रॅड्यूएट एक्झामीनेशन या परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. दिल्ली येथील नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन द्वारे घेतलेल्या या परीक्षेचे वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. त्यांच्या या यशाबद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोरनाना हंबर्डे, उपाध्यक्ष श्री. दिलीपशेठ वर्धमाने, सचिव श्री. अतुलकुमार मेहेर आणि सर्व संचालक मंडळाने तसेच सर्व स्टाफने प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे व डॉ. अनिकेत निंबोरे यांचे अभिनंदन केले आहे
