भारत रत्न कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नाभिक समाज बैठक संपन्न
संभाजीनगर ( प्रतिनिधी )
भारत रत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संभाजीनगर जिल्ह्यात नाभिक समाज व बहुजन ओबीसी समाजाच्या वतीने एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक खासदार तथा माजी केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली झाली या बैठकीस श्री कचरूजी जाधव यांनी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला आणि कर्पूरी ठाकूर यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, ठाकूर साहेब दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले असून त्यांनी बहुजन समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या साध्या जीवनशैलीचा उल्लेख करत, विदेशात जाण्यासाठीही त्यांच्या कडे सूट नव्हती, हे उदाहरण देण्यात आले.महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे विष्णू वखरे यांनी सांगितले की, गेले सात वर्षांपासून कर्पूरी ठाकूर यांची जयंती साजरी केली जात आहे. ते संपूर्ण बहुजन समाजाचे नेते होते. त्यांनी बिहारमध्ये पहिल्यांदा १४% आरक्षण लागू केले होते. यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.ज्येष्ठ नाभिक समाज नेते श्री सोपानराव शेजवळ यांनी सांगितले की, कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न पुरस्कार भाजप सरकारच्या काळात मिळाला, यासाठी शासनाचे अभिनंदन करतो.कार्यक्रमात ओबीसी नेते व माजी महापौर श्री भगवानराव घडामोडे उर्फ बापू यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन करत ओबीसी समाजाच्या भविष्यासंदर्भात महत्वपूर्ण विचार मांडले.यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले. श्री आमोदकर सर यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या नावाने चौक किंवा पुतळा उभारण्याची मागणी केली.खासदार डॉ. कराड यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत पुढील काळात ओबीसी मेळाव्यासाठी लागणारा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिक दुर्बल घटकांना सहकार्य आणि सामाजिक उन्नतीसाठी योगदान देण्याची ग्वाही दिली. "हा समाज माझा आहे आणि मी या समाजामुळे आहे," असे उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री कचरू घोडके यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये श्री सोपानराव शेजवळ, बाबासाहेब अपार, गिरजाराम शिरसागर, प्रभाकर लिंगायत, गणेश वैद्य, माधव भाले, दिलीप गवळी, श्री बद्रीनाथ वाघमारे, योगेश बोरुडे, श्री दिलीप अनर्थे, अशोक पवार, अशोक व्यवहारे, शिवाजी पांडव, उमेश सहज, मुंजाभाऊ भाले, सतीश जाधव, रत्नाकर बिडवे, हरिभाऊ पंडित, संतोष बोरुडे, नवनाथ घोडके, पोपट वखरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
