महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गणवेश घोटाळा..! गेवराई च्या शिक्षण विभागात "टेलर" च्या भूमिकेत गट शिक्षण अधिकारी कार्यालय ?

गणवेश घोटाळा..! गेवराई च्या शिक्षण विभागात "टेलर" च्या भूमिकेत गट शिक्षण अधिकारी कार्यालय ?

गेवराई दि. 17 : वार्ताहर  : गेवराई येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयात कुळ लावू बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांडाळ चौकडीने, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या गणवेश वाटपात, मनमानी कारभार करून, गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेशा पासून वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संविधान दिन अभियानाच्या माध्यमातून चार लाखाची विल्हेवाट लावून ही, या विभागाच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे कारनामे थांबवायलाच तयार नाहीत. बेधुंद होऊन कारभार केला जात असल्याने, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. 
 संविधान दिन पुस्तिका घोटाळा झाल्याची चर्चा असून, गट शिक्षण विभागाच्या प्रमुखांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, कापड दुकानदार, टेलर च्या भूमिकेत उभे करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
    गेवराई तालुक्यातील 315 जिल्हा परिषदेच्या शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेश अद्याप वाटप करण्यात आला नाही. वेळेत गणवेश वाटप न झाल्याने, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहे. मलिदा लाटायचा आणि चाटायचा, एवढेच धोरण ठेवून काम करणारे गट शिक्षण अधिकारी उंटावरून कारभार चालवत आहेत. गोरगरीब पोरांना दिला जाणाऱ्या 
गणवेश योजनेची, त्यांनी वाट लावून, स्वतःची झोळी भरली आहे. या अधिकाऱ्यांना कोणी जाब विचारणार आहे की नाही ? असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. शासनाकडून गणवेश वाटपासाठी 60 लक्ष रुपयांचा निधी आलेला होता. गट शिक्षण अधिकारी कार्यालयाने, सदरील निधी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना वर्ग करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभाग सांभाळणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांने चांडाळ चौकडी जमा करून; विशिष्ट एजन्सीकडून गणेश खरेदी करून वाटप केला. शासनाचे नियम धाब्यावर बसवून, कारभार केला जात आहे. अद्याप 35 टक्के शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेला नाही. काही प्रमाणिक मुख्याध्यापकांनी गणवेश निधी भांडून घेतला. त्या पैशातून दर्जेदार कापड खरेदी करून, मुलांच्या हाती गणवेश दिला. अशी चार-पाच केन्द्र आहेत.  उर्वरित 18 केंद्रातील शाळांना गट शिक्षण अधिकाऱ्यांचे नाव पुढे करून, 80 टक्के निधी स्वतःच वापरला आहे. शाळा सुरू होऊन, महिना उलटला आहे. जवळपास 30 टक्के शाळेतील विद्यार्थ्यी गणवेशा वाचून वंचित राहीले आहेत. शासनाकडून गणवेश वाटपासाठी. गेल्या वर्षीच्या गणवेश वाटप प्रकरणात काही कर्मचाऱ्यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदनामी केली. त्यामुळे, या वर्षीच्या गणवेश वाटपात त्यांनी भूमिका स्पष्ट करून, अंग काढून घेतले आहे. दरम्यान, गेवराई येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयात कुळ लावू बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांडाळ चौकडीने, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या गणवेश वाटपात, मनमानी कारभार केला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेशा पासून वंचित ठेवले आहे. या विभागाच्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कारनामे थांबवायलाच तयार नाहीत. बेधुंद होऊन कारभार केला जात असल्याने, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.