अकोले (प्रतिनिधी) – सहकार क्षेत्रात समाजाभिमुख सेवा देणाऱ्या सहयोग मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या अकोले येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. दिपक महाराज देशमुख (विश्वस्त, अगस्ती महाराज देवस्थान, ट्रस्ट) यांच्या पवित्र हस्ते संपन्न झाले. महाराजांनी या वेळी दिलेल्या आशीर्वादमय शुभेच्छा मनाला स्फूर्ती देणाऱ्या ठरल्या.
“समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकार हीच खरी ताकद असून, सहकार्य, विश्वास आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर सहकार संस्था उभी राहिल्यास गावचा सर्वांगीण विकास साध्य होतो,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.
प्रमुख उपस्थितीत ह.भ.प. रमेश महाराज भोरे (धामणगाव पाट) आणि ह.भ.प. चंद्रकांत महाराज चौधरी (सरस्वती विद्यालय, अकोले) यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास स्थानिक शेतकरी बंधू, व्यापारी, शिक्षक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याने एक सामाजिक एकात्मता आणि आर्थिक प्रबोधन यांचे दर्शन घडवले.
दिगंबर सुखदेव टेकाळे (चेअरमन, सहयोग मल्टीस्टेट) आणि त्यांच्या सहकारी संचालक मंडळाने उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानून, या संस्थेच्या माध्यमातून गावोगावी आर्थिक सेवा आणि विकास पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
*
