आज शिर्डी येथे 13 फेब्रुवारी ला सोमवारी नाभिक समाज भव्य राज्यस्तरीय वधू -वर पालक परिचय मेळावा
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या वतीने नाभिक समाजाच्या विवाह इच्छुक वधू - वर पालक परिचय मेळावा दि. 13 फेब्रुवारी रोज सोमवार शिर्डी जि. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटक राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सप्तपदी लाॅन्स,निघोज निमगाव रोड रेल्वे स्टेशन जवळ शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर येथे सोमवारी 13 फेब्रुवारी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत संपन्न होणार आहे.या मेळाव्यास वधू वर स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे अशी माहिती मेळाव्याचे आयोजक मनोज भाऊ वाघ यांनी दिली आहे.या मेळाव्यात प्रथम वधु-वर, घटस्फोटीत दिव्यांग विदुर अंध आदी सहभागी होणार असून नोंदणी झालेल्या वधू वरांना या मध्ये प्रवेशिका, वधू वर पुस्तीकांह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी मेळाव्याचस पालक व वधू वर मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान (आण्णासाहेब) बिडवे तसेच स्थानीकचे आयोजक साईभक्त मनोज भाऊ वाघ सुनील गायकवाड संजय जायबहार, दशरथ तुप्पे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी मो.1226373999 या नंबर वर संपर्क साधावा....