पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचे काम केले :- बदामरावजी(आबा) पंडित
----------------------------------------
निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा
शुभम घोडके
गेवराई (प्रतिनिधी) आपल्या लेखणीतून समाजासाठी मौलिक कार्य करणारे, समाजाला आरसा दाखवणारे, प्रसंगी रोष पत्करून धाडस करून सत्य लेखनी करणारे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जिवंत ठेवण्यासाठी पत्रकार बांधवांचे मोठे योगदान आहे पत्रकार बांधवांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे अशा शब्दातून पत्रकारांच्या कार्याबद्दल माजी राज्यमंत्री बदामरावजी पंडित यांनी गौरव केला.
गेवराई शहरातील सिंधी भवन येथे सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीनिमित्त गेवराई तालुका निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन व पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित आपल्या भाषणात म्हणाले की पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे आपल्या लेखणीतून समाजासाठी मौलिक कार्य करणारे, समाजाला आरसा दाखवणारे, प्रसंगी रोष पत्करून धाडस करून सत्य लेखनी करणारे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जिवंत ठेवण्यासाठी पत्रकार बांधवांचे मोठे योगदान आहे आपल्या लेखणीने समाजातील प्रश्न समस्या सोडवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करतात तालुक्यात विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान दिले नाही पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अल्पशा नुकसान भरपाई दिली असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे या विरोधात पत्रकाराने आपल्या लेखणीच्या द्वारे आवाज उठवला पाहिजे. तसेच पुढे बोलताना मुक्ती मोईनुद्दिन साहब कासमी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की पत्रकारांकडून नवनवीन माहिती लिखाण केले जाते मात्र काही वेळेस पत्रकारांनी केलेल्या कार्यावर गदा आणण्याचे काम काही लोक करतआहेत पत्रकारांचे लेखणीवर जाणून-बुजून गदा आणण्यात येते पत्रकारांना त्यांच्या कार्यापासून रोखले जाऊ नये तसेच सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मनोगत त्यांनी यावेळी मांडले यावेळी उपस्थित मनसे जिल्हाप्रमुख राजेंद्र मोटे, शिक्षक संघटनेचे गेवराई तालुका अध्यक्ष ढाकणे साहेब, केंद्रप्रमुख मोरे, पौळाचीवाडीचे भाजपचे कार्यकर्ते शरद जाधव, मुख्याध्यापक जितेंद्र दहिफळे, प्राध्यापक समाधान इंगळे, शरद सदाफुले,आदींनी भेट देऊन सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, मुक्ती मोईनुद्दीन साहब कासमी, मौलाना शब्बीर अहमद अशरफी, बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती अण्णा महाराज, डॉ. बी. आर मोटे, निर्भीड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्रजी ढाका, जिल्हा उपाध्यक्ष उस्मान शेख, जिल्हा सचिव समीर काजी, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल कापसे ता. उपाध्यक्ष शेख सलमान, ता सचिव बाळासाहेब घाडगे, ता.कार्याध्यक्ष शिवनाथ काळे, ता. संघटक भाऊसाहेब महानोर, कोषाध्यक्ष समीर सौदागर, ता.सह संघटक अशोक मोरे, प्रसिद्ध प्रमुख मनोज शेंबडे, शहराध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, शहर उपाध्यक्ष सलीम शेख, शहर सचिव अंगद गावडे, कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण शिंदे,हारून शेख,जुनेद तांबोळी, संकेत खेडकर, अरूण खरे, औदुंबर खेडकर, आकाश खेडकर, सय्यद गफ्फार, असलम कादरी, खदीर बागवान, खय्युब बागवान आदी उपस्थित होते.