गोदापात्रात अवैध वाळू उत्खनन करणारांना लावला चाप
बीडचे तहसीलदार हजारे यांनी केली कारवाई
गेवराई प्रतिनिधी :
राक्षसभूवन, मिरी पॉइंट, म्हाळसपिंपळगाव येथील गोदापात्रातून दिवसरात्र बेसुमार वाळू उपसा करून अवैध मार्गाने वाहतूक करत असल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयांचे महसूल बूडत असून या माफियावर लगाम लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी बीडचे तहसिलदार हजारे यांचे पथक स्थापण करताच पहिल्या दिवशी गुरुवारी पहाटे २ हायवा टिप्पर जप्त करत वाळू माफियांना दणका देत दंडात्मक कारवाई केली आहे या बाबत अधिक माहिती अशी तालुक्यातून गेलेल्या ८० किमी लाबं गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उतखन्न करुन वाहतुक केली जात असल्याचे अनेक तक्रारी येवून ही शुन्य कारवाई होत असल्याने महसुल प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाल आहे.मात्र तरी ही गेल्या वर्षी ४ फेब्रुवारी रोजी शिंदे नामक तरुणांचा केनी चालवत असतांना मृत्यु झाल्याची घटना धडलेली असतांना ही याच राक्षसभूवन येथील मिरी पॉइंट वरुन अवैध वाळू उतखन्न केलेली हजारो ब्रास वाळू शेकडो हायवा टिप्पर या वाहनाने वाहतुक करुन शासनाचे महसूल बूडवले जात आहे.तर म्हाळसपिंपळगाव येथे ही काही ठराविक वाळू माफियांनी शेतातच गेट बनवून जणू काही गोदापात्राचे मालक झाल्या प्रमाणे ५० केन्याने वाळु उतखन्न करुन गेट असलेल्या शेती मालकाला ३ हजार टिप्पर प्रमाणे पैसे देवून सर्रास उपसा करत अवैध वाळू वाहतुक केली जात असल्याने जिल्हात ओरळ सुरु झाली मात्र तहसिलदार सचिन खाडे यांनी कारवाई करुन देखील प्रशासना कडून त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याने वाळू माफियांची मुजोरी वाढली असून रात्रीतून बेसुमार उपसा करुन वाहतूक करत असल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने वाळु माफियांना धडा शिकवण्यासाठी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुहास हजारे बीड यांचे पथक स्थापण करुन सक्त आदेश देत
वाळू माफियांचे कंबरडे मोडत पहिल्याच दिवशी गुरुवारी पहाटे गेवराई येथे दोन हायवा टिप्पर पकडून जप्त करत दंडात्मक कारवाई केली आहे.
या कारवाईत मंडळअधिकारी निशांत ठाकुर,तलाठी बागंर ,बाबा बडे,आधंळे हे होते.
चौकट: राक्षसभुवन येथील शेतात असलेल्या मिरी पॉइंट येथे ४ फेब्रुवारी २०२२ रोजी केनी चालकाचा मृत्यु झाल्याची घटना घडून ही पुन्हा
त्याच ठिकाणी सर्रास केनी च्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उतखन्न करुन वाहतुक केली जात असल्याने या पुर्वी सारखी घटना पुन्हा धडण्याची
शक्यता असून महसूल प्रशासनाने या ठिकाणी अद्याप कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
चौकट:
म्हाळसपिंपळगाव येथील गोदापात्रात बेसुमार वाळु उपसा होऊन ही या ठिकाणी टोल नाका प्रमाणे गेट टाकून अवैध वाळु वाहतुक करणा-या वाहनाना रस्ता देण्यासाठी ३ हजार रुपये प्रत्येक टिप्पर मागे उखळत एका प्रकारे चोरटी वाहतुक करण्यास सदरिल गेट धारक प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत असून प्रशासन कारवाई करण्यास गेले तर गेट ला कुलुप ठोकुन पसार होत असल्याने कारवाई करण्यास अडचन निर्माण होत आहे.सदरिल गेट धारकांचा वाळु चोरीत प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांच्यावर महसूल प्रशासनाने बोजा टाकून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.