महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकार दिनकर शिंदे यांनाअप्रतिम मीडियाचा चौथास्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकार दिनकर शिंदे यांना
अप्रतिम मीडियाचा चौथास्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

मुंबई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील  रोखठोक आणि विविध विषयावर  बॉटम लाईन च्या माध्यमातून सडेतोड लिखाण करणारे पत्रकार प्रा दिनकर शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते दर्पण दिनी अप्रतिम मीडियाचा "चौथास्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार" मुंबई येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर च्या भव्य सभागृहात वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातून आलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे. 
           पत्रकार प्रा दिनकर शिंदे गेवराई तालुक्यात दैनिक पार्श्वभूमीचे पत्रकार म्हणून गेल्या 23 वर्षापासून समाज हितासाठी रोखठोक लिखाण करत आहेत. कलाविष्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा दिनकर शिंदे हे गेल्या 30 वर्षापासून कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत असून, राजकीय क्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख आहे. प्रा शिंदे हे परखड वक्तेही आहेत. त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला व कष्टकरयांच्या कामाला योग्य दाम मिळावे यासह नागरिकांच्या आरोग्यासाठी बाधक ठरलेल्या वितभट्ट्या बाबत सातत्याने लिखाण केले आहे. गेवराई तालुक्यातील गोदावरी आणि सिंदफणा नदीतून बेकायदेशीररित्या होणाऱ्या वाळू उपसा विरोधातही त्यांनी लिखाण करून पर्यावरण वाचविण्यासाठी शासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अप्रतिम मीडिया मुंबई यांच्या वतीने त्यांना चौथास्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तो दिनांक 6 जानेवारी 2023 या दर्पण दिनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या  सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रा दिनकर शिंदे यांना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित होणारे गेवराई तालुक्यातील ते पहिले पत्रकार ठरले आहेत. यावेळी सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, तसेच विशेष गौरवमूर्ती एम एस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, निमंत्रक विवेक देशपांडे आदी  उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्रतिम मीडीयाचे संचालक डॉ अनिल फळे यांनी तर संयोजन विवेक देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शेटे यांनी केले. दर्पण दिनी झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उच्च प्रशासकीय अधिकारी आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यातील पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.