"तो" सहा दिवस मृत्युशी झुंजत होता..!
अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिल हातागळे यांचे निधन
गेवराई प्रतिनिधी
अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचे शुक्रवार ता. 6 रोजी पहाटे पाच वाजता निधन झाले. सहा दिवसापासून तो औरंगाबाद च्या खाजगी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. श्रीक्षेत्र नारायण गडावर दर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना 1 जानेवारी 2023 रोजी दु. दोन वाजता त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव वेगात निघालेल्या चार चाकी गाडीने धडक दिली होती. या अपघातात काकडे भैय्या ( वय वर्ष 21 ) हा युवक जागीच ठार झाला होता. सुनिल प्रभाकर हातागळे ( वय वर्ष 21 ) हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बीड हून औरंगाबाद येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सहा दिवस त्याने मृत्युशी झुंज दिली. अखेर, शुक्रवार ता. 6 रोजी पहाटे पाच वाजता सुनिल हातागळे याचे निधन झाले. शुक्रवारी सायं पाच वाजता मांगीरबाबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते. सुनिल प्रभाकर हातागळे याचे दोन महिन्या पूर्वीच लग्न झाले होते. तो होतकरू, मितभाषी स्वभावाचा होता. त्याच्या अकाली मृत्युने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.