खेळायला प्रधान्य देणारा युवा खेळाडू:-कृष्णा वादे
----------------------------------------
आमचेही ध्येय मुळातच दोन हातात मावेल एवढं स्वत:ला घेऊन चालणं सोपं नसतं खरंतर आई - वडिलांचा चाललेला संघर्ष, आता आम्हाला बघवत नाही. हाच ध्यास जोपासून यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करण्यात यावा अशी आशा बाळगायला हवा म्हणत सत्याची कास धरून आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारा युवा उद्योजक कृष्णा विठ्ठलराव वादे होय.
अगदी वयाच्या लहानपणापासून क्रिकेटची आवड असणारा युवा खेळाडू म्हणून सर्व पराजित असलेला कृष्णा विठ्ठलराव वादे यांची किमया खूपच सोनेरी पहाट असताना वेळोवेळी अनुभवायला मिळाले शालेय वयात असताना जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथे पहिली ते सातवीपर्यंत व सातवी ते दहावीपर्यंत न्यू हायस्कूल शाळा, गेवराई येथे शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केले असता उच्च शिक्षणासाठी गेवराई शहरातील नामांकित असलेले र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथील कला शाखेत पूर्ण केले आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून यासाठी वयाच्या 17 व्या वर्षापासून चेतना फोटो स्टुडिओ 2009 ते 2012 पर्यंत फोटोग्राफर म्हणून काम केले हे काम करत असताना ग्राहकांचा विश्वास जोपासुन ग्राहक हाच आपला देव आहे हे ब्रीद वाक्य डोक्यात ठेवून त्यांनी चांगले काम केले. फोटोग्राफर क्षेत्रात अनुभव घेत 2012 साली तहसील रोड, गेवराई येथे राजनंदनी डिजिटल फोटो स्टुडिओ म्हणून छोटेसे रोपटे लावले त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले यांचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. कृष्णा भैय्या नेहमी खेळायला प्राधान्य देतात. गेल्या अनेक वर्षापासून विविध खेळ खेळत असताना क्रिकेट ह्या खेळात ते किंगमेकर असल्याचं गेल्या काही दिवसापूर्वी पाहायला मिळालं. साहेब चषक 2022 यामध्ये श्री अरुण (नाना) मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एम. क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सर्व शिलेदारांनी बक्षिसाची चौफेर मिळवली. यांची चर्चा पूर्ण बीड जिल्ह्यात झालीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करत असताना चाकरवाडी चे माऊली (दादा) यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महिन्याच्या दरम्याला त्यांची नेहमी वारी असते असो एवढ्या लहान वयात उंच भरारी घेऊन यशाचा गमन गाठवण्यासाठी भैय्या नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांचा आलेख नेहमी उंचावावा हीच अपेक्षा व्यक्त करतो. कृष्णा भैय्या वादे आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्री.चिंतेश्वरा चरणी प्रार्थना..!!
-लेखक :-शुभम घोडके(उपसंपादक)