श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गेवराई येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
----------------------------------------
गेवराई:(प्रतिनिधी) येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्तीदिन,बालिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा मोरगांवकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सारिका रामदासी यांची उपस्थिती होती. व्यासपिठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेतील कु.आराध्या लखनसिंह चौहान ही विद्यार्थिनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आली तर चि.अमर आगलावे,आदित्य वादे, ईश्वर घुलपे ,नरेंद्र हारकळ, प्रथमेश चंदने,साई कांबळे,कू.दिव्या सोनकांबळे,शांभवी बोर्डे, कार्तिकी नावडे, ऋतुजा गायकवाड,आरती म्हेत्रे, स्नेहल चाटे, आराध्या ढाकणे,भक्ती बारावार,या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या कार्याविषयी माहिती सांगितली.तसेच इयत्ता 9 वी वर्गातील कू.आरती अनिल म्हेत्रे या विद्यार्थिनीने साप्ताहिक प्रकाश आधार व झुंजार नेता या वृत्तपत्राच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा लेख सर्व विद्यार्थांना वाचून दाखवण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख श्रीमती माने ताई यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.सावित्रीबाई मुळेच आज स्त्रिया विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.मुलींनी शिक्षणाला महत्त्व देऊन,चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपली प्रगती साधावी. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोलाचे कार्य केले.त्या काळी मुलीने शिक्षण घेणे समाजमान्य नव्हते.स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे.अशी स्थिती होती.अश्या प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी स्वतः शिक्षण घेऊन मुलींना शिकवण्याचे काम केले.
यावेळी अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापिका श्रीमती मोरगांवकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळेच आजची महिला घराबाहेर पडत आहे,मुली शाळेत येऊन शिकत आहेत.आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.तुम्ही सर्व मुलींनीही खूप अभ्यास करून आपले नाव उज्ज्वल करावे.असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कू.समृध्दी सांगुळे तर आभार प्रदर्शन कू. वैशाली परळकर हीने केले.