स्त्री शिक्षणाच्या जनक: सावित्रीबाई फुले
----------------------------------------
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी, 1831 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगांव
येथील दलित कुटुंबात झाला. त्यांचा वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. 1840 साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले. क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. ज्या वेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले नव्हते. सावित्रीबाईंच्या समाज कार्यात ज्योतिबाची त्यांना भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू केले. ज्योतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. या नंतर त्यांनी सावित्रीबाईंचे प्रवेश एका विद्यालयात झाला. समाजातील लोक याला विरोध करू लागले होते.पण त्याकडे लक्ष न देता क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या. ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले. या शाळेत त्या काळात केवळ 9 मुलींनी प्रवेश घेतला. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या काळात दलित व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार न होता. ज्या वेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असता तेव्हा रस्त्यांना जात असताना लोक त्यांच्यावर शेण व कचरा फेकत असतं. तरीही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.
सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला महिला मुख्याध्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेता होत्या. एकणाविसव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता, सतीप्रथा, बाल विवाह, विधवा विवाह ई. क्रुरिती विरुद्ध सुद्धा कार्य केले. सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करायला जात असलेल्या एक गर्भवती विधवा महिला, यांना वाचवून आपल्या घरी डिलिवरी केले. त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तक पुत्र म्हणून मोठे केले. 10 मार्च 1897 साली ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. ज्योतिबांच्या राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वाचितांच्या अधिकारांसाठी घालून दिले. आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व ज्योतिबांच्या प्रयत्नामुळेच होती. अश्या या महान समाज सुधारकांना माझा प्रणाम.
-शुभम घोडके (उपसंपादक)