आष्टी प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जेव्हा आपण सिंहावलोकन करतो तेव्हा हे लक्षात येते की देशाने विविध टप्प्यावर प्रगती साधली आहे.आज देश विविध क्षेत्रात मोठी झेप घेत आहे.शिक्षक हा सदैव विद्यार्थीच असतो.विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही घडत असतो.लातूर,कोटा येथील नामांकित क्लासेसच्या शाखा आष्टीत सुरू केल्यास आम्ही त्याचं स्वागतच करू.इथल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञानाची संधी इथेच उपलब्ध होईल.बाहेर जाऊन खर्च करण्याची गरज पडणार नाही.एक पाऊल पुढचे म्हणून आपण जून महिन्यात विधी महाविद्यालय सुरू करित आहोत.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.प्रमुख वक्ते प्रा.भाऊसाहेब जगताप म्हणाले की,देशभक्ती रक्ताच्या थेंबा थेंबात भिनली पाहिजे.स्वातंत्र्य कुणाला कमी लेखू देत नाही.युवाशक्तीला विधायक कामात आणण्यासाठी हे कार्य शिक्षकच घडवू शकतो.आदर्श पिढी घडवण्यासाठीच प्रजासत्ताकाने स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय हे स्वातंत्र्य बहाल केली आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ,सुभान शेठ पठाण,प्रा.महेश चवरे,तय्यब शेख आदी उपस्थित होते.डॉ.रवी सातभाई यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.सुहास गोपणे यांनी आभार मानले.यावेळी एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आणि पिंपळेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.