आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाने फार मोठी गरुड झेप घेतली आहे.या आष्टी शहरामध्ये मी लहानाचा मोठा झालो.माझे वडीलही याच परिसरामध्ये शिक्षक होते.अहमदनगर आणि बीड या दोन शहरांच्या मध्ये फक्त एकच महाविद्यालय होते.या छोट्याशा रोपटाचा महावृक्ष होताना मी पाहतो आहे.किशोर नाना हंबर्डे आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,त्यांचे सर्व सहकारी,यांच्या परिश्रमाने प्रगतीचा आलेख उंचावला आहे.ही कौतुकाची बाब आहे.असे नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रदीप रोडे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आणि पिंपळेश्वर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे तसेच सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ,डॉ.प्रताप गायकवाड,प्रा.महेश चौरे,सुभान शेठ पठाण हे यावेळी उपस्थित होते.यावेळी प्राचार्या भाग्यश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम रसिका श्रोत्यांच्या कौतुकास पात्र ठरला.आज दिनांक 28 जानेवारी रोजी हंबर्डे महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीं सादर करीत असलेला स्नेहसंमेलना निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.