गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ऑलम्पीयाड परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव.
गेवराई प्रतिनिधी
गुरुकुल इंग्लिश स्कूल मन्यारवाडी रोड येथे 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रा. मोहन ठाकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला स्कूलच्या प्राचार्य सौ. अरुणा ठाकर यांनी आपल्या भाषणात वर्ष भरातली स्कूलची प्रगती उपस्थिताना सांगितली. पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कुमारी कदम साधना व सोनमाळी आकांक्षा या विद्यार्थिनीने केले ऑलंम्पीयाड परीक्षेत मध्ये कु. वैष्णवी हरिभाऊ करांडे या विद्यार्थिनीने गोल्ड मेडल प्राप्त केले व प्रथम श्रेणी मध्ये येण्याचा मान मिळावला विभागीय स्तरावर निवड झाली इतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा करण्यात येतो याबद्दल आपले विचार मांडले व विशेष केजी च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजा बद्दल माहिती दिली शिक्षकांमधून श्री. चव्हाण सर व पवार मॅडम यांनी देशभक्तीपर गीत गायले इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित शिक्षक वर्ग पठाण सानिया.आश्विनी झेंडेकर.वैष्णवी लांडे. राधा सुरवसे सविता यवलकर.
मनीषा चव्हाण. पवार सरिखा. वादे सर शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. घुले सर यांनी केले