गेवराई (प्रतिनिधी ) - यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानने विविध पुरस्कारांची घोषणा केली असून यावर्षीचा यशवंतरत्न राज्य स्तरीय पुरस्कार येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व प्रा . राजेंद्र रंगनाथराव बरकसे यांना जाहीर करण्यात आला आहे. राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले. प्रा.राजेंद्र बरकसे यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार जाहीर होताच प्राचार्य डॉ. एम. बी. गाढवे, प्राचार्य डॉ .दीपाताई क्षीरसागर,प्राचार्य डॉ . वसंत सानप, प्राचार्य प्रो .रजनी शिखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराम लाखे , नितीन गोपन, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीरंग गोडबोले , मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ . गणेश चंदनशिवे ,जेष्ठ रंगकर्मी विधिज्ञ सुभाष निकम, अभिनेते डॉ. सुधीर निकम, विधिज्ञ संतोष वारे, प्रकाश भुते, नाटककार डॉ. बापू घोक्षे, प्रकाश दावणगिरे, कृष्णा कनपुरे , शाहीर विलास सोनवणे,दिनकर शिंदे, अभिनेते प्रशांत रुईकर , विष्णूप्रसाद खेत्रे, रंजित सराटे, अभिनेता अशोक कानगुडे, अमोल धोंगडे, प्रा .असलम युनूस, अविनाश कांबिलकर, कैलास टोणपे, रोहित पुराणिक, दीपक गिरी, शेख हारुण, पत्रकार, जेष्ठ व नवोदित कलावंत, साहित्यीक, योगशिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.