राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
----------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) आज १२ जानेवारी रोजी सकाळी श्री.मंगलनाथ मल्टिपल निधी गेवराई येथे स्वराज्यजननी, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस श्री मंगलनाथ अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री. केशव पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मॅनेजर दत्ताभाऊ देशमुख, क्लार्क श्याम खंडागळे, उदय महामुनी, ओमकार काळे, पिग्मी प्रतिनिधी उमेश नाईक, कैलास कापसे, शुभम घोडके, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.