आष्टी प्रतिनिधी
अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटल मध्ये फेलोशिप करीत असलेला एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ.हुमायुद्दीन अल्लाउद्दीन यांचा संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनात सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,अविशांत कुमकर,अविनाश कदम,निसार शेख या मान्यवर पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ, डॉ.प्रताप गायकवाड,सुभान शेठ पठाण, प्रा.महेश चौरे,सर्व संचालक,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे आदि उपस्थित होते.