महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

एनजीओ बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनतर्फे राज्यातील 36 व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सामाजिक क्षेत्रातील 5 व्यक्तींना तर पत्रकार क्षेत्रातील 16 व शिक्षण क्षेत्रातील 15 व्यक्तींना सन्मानित

एनजीओ बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनतर्फे राज्यातील 36 व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सामाजिक क्षेत्रातील 5 व्यक्तींना तर पत्रकार क्षेत्रातील 16 व शिक्षण क्षेत्रातील 15  व्यक्तींना सन्मानित
 
प्रतिनिधी | औरंगाबाद

तरुण पत्रकारांना व समाजसेवकांना तसेच शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार दिल्याने हेच पुरस्कारथी  आगामी काळात विद्याथ्यांच्या माध्यमातून सुज्ञ व नवसमाज निर्मितीचे काम करतील, असा आशावाद शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी व्यक्त केला. बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनतर्फे राज्यातील 36 पुरस्कार्थांना रविवारी (29 जानेवारी) जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्या वेळी ते बोलत होते.

  एमजीएम युनिव्हर्सिटी परिसरातील आर्यभट्ट मंदिरात आयोजित या विशेष सोहळ्याचे उद्घाटक उपसंचालक आरोग्य आणि सुरक्षा विभागाचे धीरज खिरोडकर होते तर आत्माराम बोराडे डॉक्टर प्रवीण चाबुकस्वार शेख सिराज सुजाउद्दीन इनामदार उपस्थिती होते तर या पुरस्काराचे विशेष आकर्षण सिने अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यांची मोलाची उपस्थिती मंचावर होती.

जिल्ह्यातील सहा पत्रकारांचा गौरव

 प्रा. पंजाबराव मोरे (दैनिक सामना) उज्वला साळुंके ( दैनिक सांजवार्ता) विद्या गावंडे (दैनिक दिव्य मराठी) संजय हिंगोलीकर (दैनिक लोकप्रश्न) कल्याण अन्नपूर्णे (दैनिक वृत्त टाइम्स) अरुण सुरडकर (दैनिक सामपत्र)

सामाजिक पुरस्कार आत्माराम बोर्डे (औरंगाबाद)  शैक्षणिक व कला प्रल्हाद शिंदे (औरंगाबाद) सामाजिक पुरस्कार दिलशाद तांबोळी (उस्मानाबाद) व सद्गुरु सेवा प्रतिष्ठान (पुणे) यांना तर सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार शाहीर अजिंक्य लिंगायत (औरंगाबाद)

शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार

तुकाराम भवर (औरंगाबाद), जयश्री पवार (औरंगाबाद) डॉ. गायत्री पाटील (नंदुरबार) डॉ. कैलास काकडे (अमरावती) मनीषा शिरटावले (सातारा) अनुपमा दाभाडे, कुसुम मेरुरकर (सातारा) रसिका रेवाळे (रत्नागिरी) संजय पाटील (पालघर) भारती शिवनकर (गडचिरोली) सोनी कानडे (सोलापूर) दर्शना मुकणे (पालघर) जाकिरा जावेद मुल्ला (सातारा) गोविंद देसाई (कोल्हापूर) मनोहर मोहरे (पुणे)

कार्यक्रमाचे उदघाटक धीरज खिरोडकर आपल्या मनोगतात म्हणाले की, बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था नोबल कार्य करत आहे. वंचित दुर्बल घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. अजंता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण चाबुकस्वार म्हणाले की संस्थेचे कार्य हे अनमोल कार्य आहे अनाथांना, निराधारांना आधार देण्याचं काम ही संस्था करत आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर आपल्या मनोगतात म्हणाल्या की, आज माझ्या शिक्षक आईला माझ्या हस्ते पुरस्कार मिळत आहे हे भाग्य मला आज या संस्थेने मिळून दिले.संस्थेचे प्रमुख तथा कार्यक्रमाचे आयोजक रामदास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात अनिल साबळे म्हणाले, 'शासनही वंचित दुर्बल घटकातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी  कार्य करत आहे. एकही मुल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु यात कुठेतरी शासन पोचू शकत नाही त्या ठिकाणी एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहे खरोखरच या संस्थेचे अभिनंदन करावेसे तेवढे कमीच आहे.

संदीप बेंद्रे,दैनिक मराठवाडा साथी (बीड) अनिल गायकवाड दैनिक लोकमत (बीड) रफिक घाची दैनिक डहाणू मित्र (पालघर) अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद  साप्ताहिक युवा (औरंगाबाद) सुनील पोपळे साप्ताहिक प्रकाश आधार (बीड) सिद्धेश्वर विश्वेकर दैनिक सुपुत्र (लातूर) आदींचा समावेश आहे. 

 कार्यक्रमाचे उद्घाटक धीरज खिरोडकर पुढे म्हणाले की, वंचित दुर्बल घटकातील मुलांना मदत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आपण सर्व शिक्षक मोठे काम करत आहात यासाठीच आपणास जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. या संस्थेने मात्र वेगळी वाट निवडत तरुण शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्यावर भावी जीवनात खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हेच तरुण शिक्षक सुज्ञ, बुद्धजीवी आणि जबाबदार नागरिक करण्यासाठी व नवसमाज निर्मितीची जवाबदारी अशा शिक्षकांना आता पार पाडावी लागेल,' असेही त्यांनी म्हटले. शेख शिराज सुजाउद्दीन इनामदार यांनी या संस्थेचे प्रश्न  सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.  कार्यक्रमाचे आयोजक वाघमारे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याविषयी व पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी काय निकष वापरले याचा उहापोह केला. प्रसिद्ध व्याख्याते संदीप ढाकणे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रसिद्ध गझलकार रज्जाक शेख यांनी आभार मानले. मीरा वाघमारे, कल्पना फुसे,अण्णा आंधळे, संतोष पांचाळ, शामराव रावले, नागनाथ घाटूळे, विजयकुमार काळे,अंशीराम वाघमारे,अमर सपाटे, ऋत्विक वाघमारे, संदीप अझादे, प्रेरणा वाघमारे, निलेश उघडे, दीपक वाघमारे आदींनी कार्यक्रम यशस्वी केला.