चोरी: वृद्ध दामपंत्य घरात भर दिवसा चोरी; नागरिकांत भीती
----------------------------------------
गेवराई (शुभम घोडके) गेवराई येथील गजानन नगरातील रहिवाशी वृध्द दामपंत्य रामकिसन बाबुराव रानमारे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी दहावाजेच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे गजानन नगर परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
तसेच पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार घराच्या एका खोलीत रामकिसन बाबुराव रानमारे हे वयोवृध्द दापंत्य राहत आहेत दि 28 शनिवार रोजी सकाळी 10 च्या सुमारास दामपंत्य दर्शनासाठी बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्यानी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलुप तोडुन कपाटातील नगदी रक्कम चोरुन व सामानाची नासधुस केली दामपत्य काही वेळानी घरी परत आले असता घरातील सामानाची नासधुस करुन कपाट उघडे दिसले असता यावेळी त्यांनी याची पुर्ण माहिती त्यांच्या मुलाला दिली नंतर मुलांनी वृध्द दामपत्यास घेवुन गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सदर या परिसरातील शालेय विद्यार्थ्याच्या घरा समोरील साईकल चोरीच्या घटना वाढत आहे त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.