महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हंबर्डे महाविद्यालयातील नववर्ष काव्य मैफिलीने भारावून गेलो;. गजानन दराडे

हंबर्डे महाविद्यालयातील नववर्ष काव्य मैफिलीने भारावून गेलो;.  गजानन दराडे   

आष्टी प्रतिनिधी  

  गेली पंधरा वर्षापासून हंबर्डे महाविद्यालयात नववर्षारंभी काव्यमैफील आयोजित केली जाते.दरवर्षी नव्या कवींना आमंत्रित केले जाते.यावर्षी मी भारावून गेलो.सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या,रसिक आणि कवी यांच्यात संवाद घडवून आणणाऱ्या महाविद्यालयाच्या आयोजकांना धन्यवाद देतो.असे प्रशंसनीय उद्गार कवी गजानन दराडे यांनी काढले. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हंबर्डे महाविद्यालयात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल सेठ मेहेर,सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे आणि त्यांचे सर्व सहकारी,एका सुंदर कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करतात याबद्दल धन्यवाद देताना ते बोलत होते.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रमात संपादक अविनाश कवळे हे प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते.पी.एस.आय.संतोष खेडकर आणि अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.ज्ञानदेव नारळे,पंडित बोरुडे,मंगेश गुरव,संजय काकडे,प्रा.पवार,पत्रकार राजेंद्र लाड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केले.सूत्रसंचालन कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले.कवी गजानन दराडे यांनी सादर केलेल्या विविध ढंगातील कवितांनी रसिक श्रोते भारावून गेले.डॉ.रवी सातभाई यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे, अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे, कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव, डॉ.सुहास गोपने,प्रा. महेंद्र वैरागे यांनी परिश्रम घेतले.