सिध्दगडच्या बलिदान भूमीत केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना मानवंदना
मुंबई प्रतिनिधी संजय पंडित
दि.०२ मुरबाड (ठाणे) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांच्या बलिदान दिना निमित्त सिद्धगड येथे सोमवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. हीच वेळ साधत हुतात्मा विर भाई कोतवाल चित्रपट दिग्दर्शक एकनाथ देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचा प्रसंग नाट्य रुपात सादर केला, त्यावेळी सर्वांच्या अंगावर शहारे आले होते.
या कार्यक्रमासाठी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार तथा स्मारक समितीचे अध्यक्ष गोटिराम पवार , दिगंबर विशे , सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्य उल्हास बांगर , रेखाताई कांटे , मुरबाड पंचायत समिती सभापती स्वरा चौधरी , उल्हासनगर महानगर पालिकेचे उप महापौर भगवान भालेराव,आदी मान्यवरांसह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते
एक जानेवारीच्या सायंकाळ पासूनच सिद्धगड पर्वताच्या घळीत असलेल्या बलिदान भूमीत ठाणे,रायगड व पुणे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी व देशप्रेमी नागरिक दाखल झाले होते, रात्रभर सुरू असलेल्या वकृत्व व समूहगीत स्पर्धामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना मान्यवरांचे हस्तेव्यावेली बक्षिसे देण्यात आली
सिद्धगड येथील कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी सिद्धगड स्मारक समितीला सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे नातेवाईक हरी नारायण देशमुख यांचे वतीने दोन लाख रुपये देणगी देण्यात आली होती, त्यामध्ये वाढ करून आणखी तीन लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली तर उल्हासनगर महानगर पालिकेचे उप महापौर भगवान भालेराव यांनी ५० हजार रुपयांची देणगी यावेळी दिली.
यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी नाभिक बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामधे प्रामुख्याने राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष,पत्रकार संजय पंडित,शेखर काका भोर,गोपीनाथराव बिडवे,गजानन राऊत,तुकाराम काका सोनवणे,बळीराम भोईर,नागेश जाधव,फिल्म कलाकार रवी वाघ,कमलाकर वाघमारे,जेष्ठ पत्रकार,लेखक,नाभिक मंचचे संपादक तथा समाज प्रबोधनकार भगवानराव चित्ते,ठाणे पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष सचिन कुटे,विष्णू गायके,जगन्नाथ गायके,अशोक पवार,संतोष राऊत,राजू सकपाळ,मिलिंद कदम,गणेश टोंगळे आदी नाभिक समाज कार्यकर्त्यांसह ठाणे,पालघर जिल्ह्यातील आणि मुरबाड,तालुक्यातील स्थानिक नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमात नाभिक समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करताना केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह सिध्दगड स्मारक समितीचे अध्यक्ष मा.आमदार गोटीराम पवार आणि सचिव मुरलीधर दळवी,हुतात्मा भाई कोतवाल यांचे कुटुंबीय आणि चित्रपट दिग्दर्शक एकनाथ देसले यांचा सन्मानाने गौरव करून सत्कार करण्यात आला.