पठाण अमरजान यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर
बीड (प्रतिनिधी) :- येथील साप्ताहिक माझी नगरी चे संपादक तथा मिडिया सेंटर चे प्रमुख,पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार 2023 राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
असे की गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नांनसाठी नेहमी प्रयत्नशील असणारे साप्ताहिक माझी नगरी चे संपादक तथा मिडिया सेंटर चे प्रमुख,पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार 2023 राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पठाण अमरजान यांनी आपल्या लेखणी च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे अंके प्रश्न प्रशासना समोर मांडण्याचे कार्य केले आहे व ते सोळविण्यासाठी आंदोलनकऱ्याची भूमिका घेत अनेक वेळा रस्तायवर उतरून आंदोलन,निदर्शन व उपोषणेही केली आहे.पठाण अमरजान यांनी मिडिया सेंटर च्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात करिअर करणाऱ्या अनेक युवकांना मार्गदर्शन केले आहे. जिल्ह्यातील पत्रकारांना वर्तमापत्राच्या नवीन टाईटल साठी,डिक्लेरेशन साठी,आर.एन.आई माण्यातेसाठी व अधिस्वीकृती साठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे कार्यही केले आहे.
येत्या 3 जानेवारी मंगळवार 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे दुपरी 12:30 वा.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात पठाण अमरजान यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कारसाठी पठाण अमरजान यांच नाव जाहीर झाल्याने सर्वच स्तरातून त्याच्या वर शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.