आष्टी प्रतिनिधी
हंबर्डे महाविद्यालयाने क्रीडा,साहित्य,सांस्कृतिक महोत्सवांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळे महाराष्ट्र केसरी ते चित्रपट निर्मितीपर्यंत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली आहे.याचाच एक भाग म्हणून एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय गेली 14 वर्षापासून कविता मैफिलीने नव्या वर्षाचे स्वागत करीत आले आहे.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.सोमवार दि.02 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता जालना पोलीस केंद्राचे कमांडो कवी गजानन दराडे यांच्या कवितांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.यावेळी जालना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष,दैनिक सम्राटराज चे संपादक,जेष्ठ पत्रकार अविनाश कवळे उपस्थित राहणार आहेत.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले, प्रभारी प्राध्यापक,प्रा.अशोक भोगाडे,डॉ. सुहास गोपने,प्रा.महेंद्र वैरागे,डॉ.अभय शिंदे परिश्रम घेत आहेत.