महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

सावित्रीबाई फुले सर्व सामान्याचे उर्जा केंद्र

सावित्रीबाई फुले सर्व सामान्याचे उर्जा केंद्र
----------------------------------------

3 जानेवारी 1831 पासून 10 मार्च 1897 हे त्यांचे आयुष्यमान देशासाठी आधुनिक जगण्याचा, बनवण्याचा महामंत्र देणारे ठरले नायगावच्या सावित्री खंडोजी नेवसे पाटील पुण्याच्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले झाल्या. तिथून त्यांच्या जीवनाला आणि देशाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले. भारतीय समाजात वेगळेच स्थित्यंतर घडून आले. साऱ्या जगाला वंद्य ठरलेल्या ज्योती रावांच्या कार्याची सक्रिय सात संगत देत त्यांनी कार्य कर्तृत्व घडविले ही साथ संगत केवळ म.म.म्हणणारी आणि उखाण्यात सांगणारी कधीच नव्हती अंत: प्रेरणासह परिवर्तनाचे मैदान त्यांनी निवडले
परिवर्तनासाठी समाजभूमी तयार करण्याची भूमिका घेतली जात. वर्ण,वंश, लिंग, धर्म या आधारावर विषमता पोचणाऱ्या समाजाला छंद दिला भेदाभेद करणाऱ्या तण्याकथित संस्कृतीला आवाहन दिले शेषिंताच्या उत्थापनाचा धर्मास आणि शोषकांचा स्वार्थी प्रवृत्ती विरुद्धचे युद्ध ज्योतिराव गोविंदराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी पुकारले.परिणामी आज भारतभर अनेक सावित्री विविध क्षेत्रात आपली मुद्रा उमटावीत आहेत ज्योतीराव फुले आणि सगुनाबाई उपारण्य आऊ  यांच्या संगतीने सुरू झालेला त्यांच्या चैतन्यमय कार्यप्रवास आश्चर्यकारक आहे त्याकाळी स्त्रियांना कोणते स्वातंत्र्य नव्हते त्या काळात स्त्रियांसाठी नवा विचार ,नवे कार्य, प्रारंभिले आणि पूर्णत्वात नेले.त्यासाठी सावित्रीबाईच्या विचारांची कार्याची वर्तमानाला गरज आहे त्यातूनच भविष्य निर्माण होईल वृत्तमानाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे व विचाराचे सरण अटळ असुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम करीत आहे..🙏

लेखक:-आरती अनिल म्हेत्रे

श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, गेवराई

 इयत्ता :-9वी वर्ग