महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

नंदुरबार जिल्ह्यातील जेष्ठ नाभिक समाजसेवक भाईदास महाले व भिका महाले समाज भुषण पुरस्काराने सन्मानित.

  नंदुरबार जिल्ह्यातील जेष्ठ नाभिक समाजसेवक भाईदास महाले व भिका महाले समाज भुषण पुरस्काराने सन्मानित.

  नंदुरबार प्रतिनिधी

 नंदुरबार  राज्यातील नाभिक समाजात मानाच्या समजल्या जाणाऱ्या समाज भूषण पुरस्काराचे नंदुरबार येथे शनिवार दिनांक ७ जानेवारी वितरण करण्यात आले. नाभिक समाज हित वर्धक व कर्मचारी संस्थेच्यावतीने प्रतापपुर येथील रहिवासी भाईदास महाले यांना २०२२ चा तर भिका बापू ठाकरे यांना २०२३ चा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नाभिक समाजा साठी गेल्या पन्नास वर्षापासून कार्यरत असलेले दोन्हीं समाज सेवकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेमार्फत या मनाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी राष्ट्रसंत संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान केलेल्या समाज बांधवांचाही सत्कार करण्यात आला.रक्तदान शिबिरात समाजातील २७ समाज बांधवांनी रक्तदान केलेले होते.तसेच याच कार्यक्रमात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी हरिदास सैदाने व मुख्याध्यापक आश्रम शाळेचे भरत महाले या जेष्ठ समाज बांधवांचाही सन्मान करण्यात आला.तसेच आपल्या हुद्द्यावर बढती मिळालेल्या मान्यवर समाज बांधवांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत पदावर निवडून आलेले भटीबाई सैदाणे वान्याविहीर व दीपक सैदाणे विसरवाडी या दोघांचा सत्कार करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर येथील रामचंद्र ऐशी व विकास सेन तसेच युनियन बँकेचे शाखाधिकारी जितेंद्र शिरसाट उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार शिरसाठ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला सोनवणे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव हिमांशू बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे यांनी केले.हा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संपूर्ण टीमने सहकार्य केले होते. यामधे प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे, सचिव हिमांशू बोरसे,उपाध्यक्ष अरवींद निकम, उपाध्यक्ष नितीन मंडलिक,कोशाध्यक्ष शिवाजी मिस्‍तरी , सहसचिव छगन भदाणे खापर, माजी उपाध्यक्ष गजेंद्र जाधव, नंदुरबार प्रकाश देवरे, प्रसिद्धी प्रमुख विजय सैंदाने, जिल्हा संघटक,विजय सोनवणे नंदुरबार,सुधीरनिकम, 
संचालक अनिल  भदाने ,शशिकला सोनवणे,
प्रभाकर चित्ते माजी सल्लागार,
महिला जिल्हाध्यक्षा सौ जयश्री ताई निकम नवापूर 
मयूर सूर्यवंशी, नंदुरबारओंकार शिरसाट सल्लागार, 
छगन सूर्यवंशी संचालक, अनिता सूर्यवंशी, नरेंद्र महाले संचालक,प्रभाकर बोरसे सल्लागार, एकनाथ चित्ते संचालक  प्रवीण वरसाळे ,गणेश पवार, प्रकाश सैदाणे, लक्ष्मीकांत निकम ,राजेश सूर्यवंशी सेलंबा,मिनाक्षी भदाणे नंदुरबार,प्रभाकर शिरसाट नवापूर,लक्ष्मीकांत जाधव  कैलास ढवळे सावकार, 
युवा मोर्चाचे अध्यक्ष समाधान सैदाणे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसाट तालुका उपाध्यक्ष भाईदास बोरसे, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र हिरे, तसेच जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.