संतोष यादव यांना यशवंतरत्न पुरस्कार जाहीर
जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड
अहमदनगर प्रतिनिधी
राजे यशवंतराव होळकर यांचे जयंतीनिमित्त जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांचे वतीने सन 2022 चे विशेष पुरस्कार, *यशवंतरत्न* पुरस्काराची घोषणा नुकतीच बीड येथे संस्थेचे अध्यक्ष मा श्री राजेंद्र गाडेकर यांनी केली.
त्यामध्ये अहमदनगर येथील पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांना यशवंतरत्न हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार राजे यशवंतराव होळकर यांचे राज्यभिषेकदिनी जाहीर झाला आहे.
लवकरच पुरस्कार वितरण सोहळा हा बीड येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
श्री संतोष यादव हे पोस्टल संघटनेचे राज्यउपाध्यक्षपदी व सद्या केडगाव येथे पोस्टमास्तर म्हणून कार्यरत असून सतत आपल्या ग्राहकांना *ग्राहकभिमुखसेवा*,डाक विभागाच्या विविध योजना लोकाभिमुख करणेसाठी विशेष प्रयत्नशील असतात. त्याचे या उल्लेखनीय कामाबद्ल त्याना डाक विभागाकडून वेळोवेळी गौरविण्यात आलेले असून,त्याच्या विशेष कामगिरीची नोंद घेत मा खा सुजयदादा विखे यांनीही पत्राद्वारे अभिनंदन केले आहेच. डाकसेवेतून वेळ काढत सतत सामाजिक कामात कार्यरत राहणे,आजवर केलेल्या संघर्षशील कामाची नोंद घेत संस्थेकडून घेत ही निवड केली गेली आहे.
या निवडीबदल त्याचे सिनियर पोस्टमास्तर श्री संदिप कोकाटे, सहायक अधिक्षक श्री संदिप हदगल, श्री संतोष जोशी,पोस्टल संघटनेचे राज्याध्यक्ष श्री आर एच गुप्ता, राज्य सचिव श्री संतोष कदम,श्री सुनिल झुंजारराव, राष्ट्रीय नेते श्री निसार मुजावर,श्री कमलेश मिरगणे,श्री प्रदिप सुर्यवंशी, श्री नामदेव डेंगळे श्री तान्हाजी सूर्यवंशी,श्रीमती शुभांगी मांडगे,श्री सविता ताकपेरे, श्री अनिल धनावत,श्री सोमनाथ घोडके, श्री बाबासाहेब बुट्टे, श्री शिवाजी कांबळे, श्री अंबादास सुद्रीक,श्री भाऊ श्रीमंदिलकर यांच्या सहअनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. व साप्ताहिक प्रकाश आधार व परिवार वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा