आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या सात दिवसीय, युवकाचा ध्यास,ग्राम... शहर विकास,राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे दिनांक 09 जानेवारी रोजी नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.यावेळी श्रीमती शारदा दळवी म्हणाल्या,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांनी विविध अंगी कौशल्य संपादन केले पाहिजे.प्राचार्य डॉ.निंबोरे म्हणाले,खेड्याच्या शेतीमाल उत्पादनाबरोबर सुसंस्कृततेची समृद्धी वाढावी.शेती उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी या शिबिराच्या माध्यमातून तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.ह्याचा लाभ घ्यावा.हाच आमचा उद्देश आहे.यावेळी अनेक मान्यवरांसह ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.डॉ.रवी सातभाई यांनी प्रास्ताविक केले.डॉ.सुहास गोपणे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.शुभांगी खुडे यांनी आभार मानले.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग,क्रीडा विभाग,सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.