श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
----------------------------------------
शुभम घोडके
गेवराई : (प्रतिनिधी) गेवराई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गेवराई येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष श्री प्रमोदजी कुलकर्णी सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक श्रीमती मोरगांवकर ताई व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक श्रीमती रामदासी ताई यांची उपस्थित होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती माने ताई व श्री घोलप सर उपस्थित होते मान्यवर पाहुण्याच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी 1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ तर 9वी ते 10च्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर भाषणे केली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीमती माने ताई व श्री घोलप सर यांनी विद्यार्थ्यांना अनुक्रमे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपात श्री प्रमोदजी कुलकर्णी सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीप्रमाने आपणही आचरण करावे, देश कार्यासाठी सतत प्रयत्न करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन चिं.पवन ठोसर व शंकर डमाळे याने तर आभार प्रदर्शन चिं.प्रथमेश चंदने यांने केले.