महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

ज्ञानेश्वरी आणि गाथा मानवी जीवनाचे आधार संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या कीर्तन महोत्सवात अतुल महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन

ज्ञानेश्वरी आणि गाथा मानवी जीवनाचे आधार 
------------------------
संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या कीर्तन महोत्सवात अतुल महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन
------------------------
गेवराई : (प्रतिनिधी)मनुष्य जीवनात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे ज्ञानेश्वरी मध्ये मिळते म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथा मानवी जीवनाचे आधार आहेत असे प्रतिपादन श्री संत भगवानबाबा संस्थान, ताकडगावचे प्रमुख ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. 
      गेवराई येथे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईक नगर येथे सुरु असलेल्या १८ व्या कीर्तन महोत्सवात  बुधवार दि.११ जानेवारी रोजी पाचवे कीर्तनरुपी पुष्प गुंफताना ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री बोलत होते. यावेळी ह.भ.प.परमेश्वर महाराज वाघमोडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद पौळ,  विनायक उबाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे, सचिव शिवाजी मामा ढाकणे, शेंडेकर अण्णा, गोपीनाथ घुले, अँड. प्रताप खेडकर,भास्कर ढाकणे, डॉ. सुभाष ढाकणे, गणेश भुकेले, किशोर जवकर, फुलशंकर अप्पा, बापुराव घुले, जीवनराव वराट सह आदी उपस्थित होते.
       जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या कृपावंत किती । दीन बहु आवडती ॥१॥
त्यांचा भार वाहे माथां करी योगक्षेमचिंता ॥२॥
भुलों नेदी वाट करीं धरूनि दावी नीट || ३ ||
तुका म्हणे जीवें । अनुसरल्या एक भावें ||४|| या अभंगावर चिंतन केले. पुढे बोलताना अतुल शास्त्री म्हणाले की साधू हे सगळ्यावर निस्वार्थ भावनेने प्रेम करतात तर राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. त्यांनी आपल्या कीर्तनांतून अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी आपल्या जीवनात मध्ये प्रत्येक प्राणी मात्रांवर दया केली. तर साधू लहान आणि थोर हे कधीही पाहत नाहीत ते सर्वांना समान पाहतात. साधू मनुष्याचे शरीर नाही परंतु विचार बदलण्याचे महान कार्य करतात तसेच ऱ्हदयाचे परिवर्तन करणारे साधू असतात.साधू- संताच्या सान्निध्यात परिवर्तन होतेच असेही शेवटी बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना हार्मोनियमवादक अर्जुन ढाकणे फौजी, पखवाजावर दत्ताभाऊ सटले, आणि गायनाचार्य म्हणून रामनाथ सालपे महाराज, इंद्रजित महाराज येवले, नाना महाराज कवडे सह ह.भ.प.उमेश महाराज चव्हाण यांच्या यमाईदेवी वारकरी शिक्षण संस्थेतील बालवारकरी यांची साथ लाभली. तर संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या कीर्तन महोत्सवातील कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन अर्जुन बारगजे यांनी केले.