टाकळसिंग येथे आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
आष्टी प्रतिनिधी
गावातील नागरिकांचे आरोग्य कशा पद्धतीने आहे हे तपासणी करण्यासाठी हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने खास आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे गुरुवार दि.12 जानेवारी 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद,राष्ट्रीय सेवा योजना विभाग ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालय आष्टी, ग्रामीण रूग्णालय आष्टी व ग्रामीण रूग्णालय, टाकळसिंग, रिड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडले आष्टी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी जयचंद नेलवाडे नागेश कारंडे सुनील सरवदे पढरिनाथ पारेकर तात्या धोंडे आरोग्य सेविका गायकवाड ताई पवार,आदी हे शिबीर यशस्वी केले अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी गट समन्वयक रवि सातभाई यांनी दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ सुहास गोपणे प्रा महेंद्र वैरागे, प्रा. रमेश भारूडकर ह्यांनी मेहनत घेतली.