तुळजा भवानी इंग्लिश स्कूल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
गेवराई (वार्ताहर) तुळजा भवानी इंग्लिश स्कूल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाच्या सुरवातीला बी. बी.कोकाटे सर यांच्या हस्ते प्रतीमचे पूजन करण्यात आले. व हर्षदा करांडे या विद्यार्थिनीने आजची जिजाऊ व संस्कार या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी स्नेहल जाधव या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ व संग्राम काकडे याने छ्त्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जन्माचा पाळणा यावर श्रावणी गवळी, हर्षदा करांडे, आदिती उडान, नंदिनी काळे, श्रुती सोनवणे यांनी नृत्य सादर करून जिजामाता यांच्या जन्माची आठवण करून दिली. व लेझिम सादर केले. यावेळी शिवरायांचे मुस्लिम मावळे यांची वेशभूषा साकारून सामजिक सलोख्याचे दर्षण घडले. शेख निहल, शेख रिझवान, शेख सहील, बागवान अबुजार, शेख आसिम, शेख आहीम यानी वेशभूषा साकारली होती. मुलींसाठी
काष्टासाडी, केशरी फेटा व मुलांसाठी पांढरा नेहरू, केशरी फेटा अशी वेशभूषा ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यानी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. जिजाऊ पाळणा व लेझिम सादरिकरण तापडिया सिटी सेंटर, लाल बहादूर शास्त्री चौक, छञपती संभाजी चौक, रंगार चौक या ठिकाणी सादरीकरण पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास कोकाटे, उपमुख्याध्यापिका गिता मोरे उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया विटेकर, अर्चना काळे, आरती जंगले, शालूबाई शिंदे, श्रद्धा नळदुर्गकर, सीमा घुंबर्डे यांनी परिश्रम घेतले.
