महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गेवराईत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन

गेवराईत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन
-----------------------------------
भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन
-----------------------------------
गेवराई : (शुभम घोडके) गेवराई येथे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईक नगर येथे सुरु असलेल्या १८ व्या कीर्तन महोत्सवात  शनिवार दि.१४ जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार, ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सायं ५ ते ७ या वेळेत कीर्तन होणार आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे, सचिव तथा जेष्ठ पत्रकार शिवाजी (मामा) ढाकणे यांनी केले 
  गेल्या सात दिवसापासून 
संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईक नगर येथे सुरु असलेल्या १८ व्या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांनी ज्ञान मंडपात आपली उपस्थिती लावून ज्ञान प्रबोधनाचे धडे दिले. तर शनिवार दि.१४ जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार, ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सायं ५ ते ७ या वेळेत कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.