भाऊसाहेब नाटकर यांना मातृशोक
==========
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या मातोश्री द्रोपदाबाई कचरू नाटकर यांचे शुक्रवार दि.१३ रोजी सायंकाळी वार्धक्याने दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ९५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. द्रोपदाबाई यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मुळगावी मौजे राक्षसभुवन शनीचे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.