छत्रपती फेस्टिवलला येणार अभिनेत्री तेजश्री प्रधान.
---------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) अल्पावधीतच बीड जिल्ह्यासह मुंबई,पुणे तसेच कर्नाटक मधिल बेळगाव शहरात शाखेचा विस्तार केलेल्या छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई मुख्य शाखेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती मल्टीस्टेट कडून छत्रपती फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे.यावर्षी या फेस्टिवल साठी अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित राहणार असून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त गेवराईकरांना वैचारिक मेजवानी देण्याचे काम छत्रपती मल्टीस्टेट करत आलेली आहे.यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, शिवव्याख्याते इतिहास अभ्यासक प्रा.नितिन बानुगडे पाटील, बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांना आमंत्रित करून विविध विषयावर व्याख्याने तसेच प्रबोधनपर कार्यक्रम झालेले आहेत.तसेच झी मराठीवरील सुप्रसिध्द कार्यक्रम हास्यसम्राट फेम दीपक देशपांडे यांचा "हास्यकल्लोळ" हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता.त्यानंतर दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम घेता आलेला नव्हता. मात्र यावर्षी छत्रपती मल्टीस्टेट कडून छत्रपती फेस्टिवल 2022 चे आयोजन दि.17 डिसेंबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी चौक येथील जि.प.कन्या शाळेच्या प्रागंणात करण्यात आलेले असून या कार्यक्रमास सुप्रसिध्द हवामान तज्ञ व अभ्यासक श्री.पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.त्याचबरोबर मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हे मुख्य आकर्षण असणार आहे.तसेच महिला वर्गाचा आवडता कार्यक्रम क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत "होम मिनिस्टर"खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये या वर्षी गेवराई भुषण व भुमिपुत्र भुषण असे दोन पुरस्कार वितरण करण्यात येतील.छत्रपती उद्योग समूहातर्फे दरवर्षी दिला जाणारा "गेवराई भूषण" हा मानाचा पुरस्कार या वर्षी वृक्तवाने बीड जिल्ह्याचे नाव दिल्लीपर्यत गाजवणारे युवा अभ्यासक व प्रभावी वक्ते श्री.राहुल गिरी यांना देण्यात येणार असून भुमिपुत्र भुषण गेवराई तालुक्यातील शेतकरी पुत्र,टिकटाॅक स्टार श्री.गणेश फरताडे यांना देण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाचा गेवराईसह तालुक्यातील तमाम बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार आवर्जून उपस्थित रहावे.या महिला वर्गाच्या आवडत्या कार्यक्रमा दरम्यान महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असल्याने जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन संतोष भंडारी यांनी केले आहे.