महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

सिध्दगड....क्रांतिवीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या शौर्याची आणि बलिदानाची यशोगाथा सांगणारे स्फूर्तिस्थान....

सिध्दगड....

क्रांतिवीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या शौर्याची आणि बलिदानाची यशोगाथा सांगणारे स्फूर्तिस्थान....

सिद्धगड हा किल्ला ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील एक किल्ला आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्टेशन पासून माळशेज घाट रोडवर मुरबाड तालुका आहे.येथून म्हसा आणि येथून २१ किमी अंतरावरील सिद्धगड परिसर हा भीमाशंभर अभयारण्यात येतो.नारिवली या गावापासून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पाडा हे गाव आहे. तिथून पायवाट काढत अगदी जंगलाच्या मधोमध पोहचल्यावर काकड माळ लागतो, तिथे भावरी कुटुंब फार पूर्वी पासून राहत आहे, तिथून अगदी जवळच हे स्थळ आहे. गर्द झाडे व घनदाट अरण्यात विविध प्रकारचे वन्यजीव, पशु-पक्षी आढळतात. भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येत असल्याने येथील जंगलाचे चांगले संवर्धन झाले आहे. अनेक उपयुक्त वनौषधी येथे आढळतात. दक्षिण तटावर भैरवाचे स्थान आहे.
क्रांतीकारकांची भूमी म्हणून या परिसराची ख्याती आहे. 
स्वातंत्र्य लढयात ब्रिटिशांना सळो-की-पळो करून सोडणा-या आणि आपल्या प्राणांची आहुती देणा-या वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतीकारकांची ही ‘बलिदानभूमी’ म्हणून प्रचलित आहे.तरुणांसाठी तर ही भूमी म्हणजे स्फूर्तीस्थान आहे.
२ जानेवारी १९४३ रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी इंग्रज सैन्याशी लढताना वीरमरण आले होते. तेव्हा पासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक वर्षी २ जानेवारी हा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो.
या ठिकाणी एक जानेवारी रोजी देखील समितीच्या वतीने शालेय मुलांच्या विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.रात्री भजन,पोवाडे या सारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो.
दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जानेवारीच्या पहाटे ६.१० वाजता या ठिकाणी हुतात्म्यांच्या नातलगांच्या उपस्थितीत क्रांतिज्योत प्रज्वलित केली जाते.पोलीस दलाकडूनही हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते.
अभिवादनाच्या या कार्यक्रमात राज्य सरकारचे मंत्री, स्थानिक आमदार,तहसीलदार, जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी उपस्थित असतात.
यावेळी ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकही हजारोच्या संख्येने उपस्थित असतात.
                       संकलन : संजय पंडित