बोधी फाउंडेशनचे राज्यस्तरीय 'जीवन गौरव' शिक्षक पुरस्कार जाहीर
औरंगाबाद प्रतिनिधी : एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन या शासनमान्य संस्थेच्या वतीने सन २०२२ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षकांना 'जीवन गौरव' पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातील शैक्षणिक क्षेत्रात विविध जिल्ह्याच्या कार्यकक्षेतील जिल्हा परिषद शाळा व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या एकूण १५ शिक्षकांना राज्यस्तरीय 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १५ पैकी ४ शिक्षक सातारा जिल्हा परिषद शाळेतील तर २ औरंगाबाद खाजगी प्राथमिक शाळेतील आहेत. व ९ इतर जिल्ह्यातील शिक्षक आहेत. समवेत राज्यस्तरीय 'जीवन गौरव' पुरस्कार यादी पुढील प्रमाणे- डॉ.गायत्री जितेंद्र पाटील (एस. ए. मिशन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार.) डॉ.कैलास जानराव कापडे (जिल्हा परिषद शाळा, मौजखेडा पंचायत समिती चांदुर बाजार अमरावती) मनीषा गजानन शिरटावले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपशिंगे (मिलिटरी) ,सातारा.) अनुपमा किरण दाभाडे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंढा, सातारा.) कुसूम चंद्रकांत मेरूकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्शी बारामुरे, सातारा.) जाकिरा जावेद मुल्ला (जिल्हा परिषद शाळा पवारमळा (भाटकी) सातारा.) रसिका रमेश रेवाळे (जिल्हा परिषद आदर्श शाळा सावरी नं-१ रत्नागिरी.) संजय हरिश्चंद्र पाटील ( जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यामंदिर हमरापुर, पालघर.) भारती सुनील शिवणकर ( जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिभना पंचायत समिती, गडचिरोली) सोनी प्रभाकर कानडे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कन्या माळशिरस, सोलापूर.) दर्शना जयेश मुकणे (जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा काळीधोंड पालघर.) गोविंद शांताराम देसाई (विद्यामंदिर शिराळे वारुण, शाहुवाडी कोल्हापूर) मनोहर दुलाजी मोहरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पठारवाडी पुणे.) तुकाराम बाबुराव भवर (कै. गणपतराव जगताप पाटील विद्यामंदिर औरंगाबाद.) जयश्री परशुराम पवार (श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यामंदिर जयभवानी नगर औरंगाबाद.)
राज्यस्तरीय 'जीवन गौरव' पुरस्कारासाठी एकूण ९० प्रस्ताव संस्थेच्या कार्यालयाकडे आले होते. सदर प्रस्तावातून गुणवंत शिक्षक निवडण्यासाठी तज्ञ व्यक्ती म्हणून आदर्श शिक्षक देविदास बुधवंत अहमदनगर, बाल रक्षक शामराव रावले हिंगोली, तंत्रस्नेही आदर्श शिक्षक नागनाथ घाटूळे सोलापूर, आदर्श मुख्याध्यापक विजयकुमार काळे सातारा ही समिती नेमण्यात आली होती. संस्थेच्या निकषा प्रमाणे आलेल्या प्रस्तावामभून राज्यस्तरीय 'जीवन गौरव' पुरस्कार निवडण्यात आले. पुरस्कारार्थी शिक्षकांना उत्कृष्ट सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मानाचा फेटा, पुस्तक, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी दिली.