जय भवानीचे दोन लाख मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप
नियमित सर्वाधिक गाळप करणारा एकमेव कारखाना
गेवराई, (प्रतिनिधी) ः- जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविल्यानंतर प्रतिदीन पाच हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप करुन केवळ ४२ दिवसात दोन लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप करण्याचा जयभवानीने नवा विक्रम केला आहे. कमी कालावधीत नियमित व सर्वाधिक गाळप करणार जय भवानी हा मराठवाड्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. चेअरमन अमरसिंह पंडित यांनी या प्रसंगी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळासह हितचिंतकांचे अभिनंदन केले आहे.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ केल्यानंतर कारखान्याची नविन अत्याधुनिक यंत्र सामुग्री पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. कारखान्याच्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक बदल करण्यात आल्यामुळे कारखाना गाळप क्षमतेप्रमाणे कार्यरत आहे. कारखाना सुरु झाल्या नंतर बुधवार, दि. २१ डिसेंबर रोजी जय भवानीने केवळ ४२ दिवसांत दोन लाख मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप करुन नवा विक्रम केला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नियमित गाळप करणारा कारखाना म्हणून जय भवानीची ओळख होत आहे. कारखान्याचे कर्मचारी आणि कामगार यांनी प्रचंड मेहनत घेऊन अतिशय कमी वेळेत दर्जेदार काम कामगारांनी केल्यामुळे कारखाना उस गाळपाचे नवे नवे विक्रम करत आहे. वेगवान गाळप करुन शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पेमेंट होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर योग्य भाव मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याकडून दोन लाख मॅट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केल्या बद्दल सभासद, संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, वाहतुक ठेकेदार यांनी आनंद साजरा केला.