आष्टी प्रतिनिधी
रामानुजन यांची जयंती,गणित दिवस म्हणून साजरी केली जाते.गणिताच्या क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे.अवघ्या 23 व्या वर्षी त्यांचा पहिला संशोधनपर लेख नियतकालिकात छापण्यात आला होता. गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन झोपेत सुद्धा गणित विषयाचा विचार करीत आणि झोपेतून जागे झाल्यावर ती गणित सूत्रे ते भराभरा लिहून काढीत.गणित विषय सोडून त्यांनी कुठल्याच विषयाचा विचार न केल्यामुळे इयत्ता अकरावीत एक वेळा आणि बारावीत दोन वेळा त्यांना नापास व्हावे लागले.कुठल्याही एका विषयाचा ध्यास घेतला तर आपण त्यात निश्चितच यश मिळवू शकतो.रामानुजन यांनी गणित विषयात दैदीप्यमान कामगिरी केली.असे प्रा.विष्णू चौधरी म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल शेठ मेहेर,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात,अध्यक्ष उपप्राचार्य अविनाश कंदले,प्रा.सुहास गोपने, प्रा.चंद्रकांत मडके यांनी उपस्थिती लावली. यावेळी महाविद्यालयातील सर्व गणित,विज्ञान विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.डॉ.बबन उकले यांनी सर्वांचे आभार मानले.