र. भ. अट्टल महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
---------------------------------------
गेवराई( प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालयात लोकप्रशासन विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला. प्रा. हनमंत हेळंबे यांनी विद्यार्थ्याना ग्राहक म्हणून वस्तू व सेवा घेत असतो तेव्हा आपण जागृत ग्राहक असणे आवश्यक आहे असे नमूद केले. पुढे बोलताना कायद्याची माहिती व अधिकार यावर मार्गदर्शन केले. ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा या दृष्टीने हा ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये करण्यात आलेला आहे. २४ डिसेंबर रोजी हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन (National Consumer Rights Day) म्हणून साजरा केला जातो. ग्राहक हक्क संरक्षणासाठी या कायद्यानुसार ग्राहकाला मिळालेले अधिकार जसे सुरक्षेचा अधिकार, माहितीचा अधिकार, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा अधिकार, तक्रार व निवारण करून घेण्याचा अधिकार व ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार यावर विचार मांडले. तसेच राष्ट्रीय ते जिल्हा स्तरीय ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा व त्यापुढे चालणारी प्रकरणे याचीही माहिती दिली. सदर कार्यक्रमास डॉ. रेवननाथ काळे, डॉ. संभाहरे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
