कंधार नगर परिषदेच्या हद्दीतील महाराणा प्रताप चौक ते बौद्ध द्वार वेस सिमेंट रस्त्याचे काम सुरुवात करा माजी आमदार मा.श्री. ईश्वरराव नारायण राव भोसीकर साहेब यांच्याकडे धाव घेतली. व सर्व प्रकार सांगितला असता या प्रकरणाची कसून पाहणी
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
कंधार;मुख्य महत्त्वाचा रस्ता महाराणा प्रताप चौक ते बौद्धद्वार वेस सिमेंट रस्त्याचे कामाची मान्यता सरकारकडून मिळाली आहे. त्यासाठी लागणारा निधी 5.00 कोटी रु. मंजूर ही झालेला आहे.त्या मुळे कामाचे टेंडर काढण्यात आलेले आहे. पण प्रत्यक्षरीत्या कामात अद्यापही सुरुवात झालेली नाही. कंधार शहरातील हा सर्व प्रकार पहाता जनता खुपच त्रस्त झालेली आहे.रस्ता लहान तर आहेच पणं रस्त्याच्या आजूबाजूला असलेली छोटी मोठी व्यवसायीक फळं, फुले, भाजीपाला, वैगरे आणि इतर सर्व प्रकार चे वाहने सगळाच गोंधळ एकच होत असल्यामुळे जनतेचे अतोनात हाल होत आहेत. खूप धुळीचे वातावरण तयार होते. पावसाळा असेल तर रस्त्यावर चालताना चीखल असल्यामुळे खूप कठीण जाते.त्रस्त जनतेने पुर्ण सुविधा मंजूर झालेली असुनही प्रशासने लक्ष द्यावे कारणाने कंटाळून माजी आमदार मा.श्री. ईश्वरराव नारायण राव भोसीकर साहेब यांच्याकडे धाव घेतली. व सर्व प्रकार सांगितला असता या प्रकरणाची कसून पाहणी करण्याचा निर्णय मा. भोसीकर साहेबांनी जनतेच्या आग्रहास्तव घेतला. निर्वाचित जिल्हा अधिकारी मा.श्री. अभिजीत जी राऊत साहेब यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला पाहणी करण्याचे निवेदनही केले. तसेच हे काम आपल्या अखत्यरित्या करायचे आहे. आणि या कामास सुरुवात करण्याचे आदेश कंधार नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी साहेबांना द्यावे असेही निवेदनाद्वारे कळले. तसेच नूतन जिल्हा अधिकारी मा. श्री अभिजीत जी राऊत साहेब त्यांचा सत्कार करण्यात आला. कंधार चे माजी आमदार मा. श्री ईश्वरराव नारायणराव भोसीकर साहेब, व इतर लोक ही हजर होते......