डॉ.महावीर बडजाते यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर
बीड (प्रतिनिधी) :- शहरातील कारंजा चौक येथील प्रसिद्ध आदर्श डॉक्टर महावीर शांतीलाल बडजाते यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार 2023 राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
असे की शहरातील गोरगरीब सर्वसामान्यांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आदर्श डॉक्टर महावीर शांतीलाल बडजाते यांनी तालुक्यातील रायमु येथून सन 1984 मध्ये तीन रुपये तपासणी फी वर वैद्यकीय सेवा देण्याची सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी दहा वर्ष ग्रामीण भागातील नागरिकांची सेवा केली व 1994 मध्ये त्यांनी शहरातील कारंजा चौकी येथे बडजाते हॉस्पिटल नावाने शहरी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची तपासणी फी फक्त पांच रुपये होती व नंतर सन 2000 मध्ये दहा रुपये व सध्या ते वीस रुपये तपासणी फी वर शहरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय सेवा देत आहे.बडजाते हॉस्पिटलमध्ये तालुक्यातून व जिल्ह्यातून जमात मध्ये आलेल्या भाविकांसाठी फी आकारली जात नाही त्यांना हॉस्पिटलमधील सर्व सुविधा मोफत दिले जाते. बराच वेळा बडजाते हॉस्पिटलमध्ये असे रुग्ने येतात त्यांच्याकडे फी देण्याचे ही पैसे नसते तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडून फी आकारले जात नाही उलट त्यांना औषध,गोळ्या,इंजेक्शन व हॉस्पिटलमधील सर्व सुविधा मोफत दीली जाते. डॉक्टर महावीर शांतीलाल बजाते यांच्या रुग्णांबद्दल च्या करुणाभाऊ व अत्यल्प दरात पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा बद्दल
वैद्यकीय सेवेतून त्यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ च्या वतीने राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर झाला असून येत्या 3 जानेवारी मंगळवार 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे
या अगोदरही डॉक्टर महावीर शांतीलाल बडजाते यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते कोरोना योद्धा,आदर्श डॉक्टर,चंपावती रत्न इत्यादी पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.